पुणे, 26 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील निवड यादी व प्रतीक्षा यादी १ व २ मधील लाभार्थ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” त्या तत्वावर किवळे येथील आर्थिक दुर्बल
प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने करण्यात आले आहे.
किवळे येथील प्रकल्पाअंतर्गत एकूण ७५५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर वाटप करण्यात येणार आहेत. सदनिकेची किंमत१३,००,७१८/-इतकी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये सदनिकेचा लाभ घेऊ रावेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड व प्रतीक्षा यादीतील इच्छुक अर्जदारांनी०९ मे २०२५ पर्यंत खालील कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच किवळे येथील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. तसेच,सदनिकेच्या हस्तांतरणासंबंधी अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडे राहणार आहेत.
