Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढल्या; ईडी करणार चौकशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढल्या; ईडी करणार चौकशी

Surajya Digital
Last updated: 2021/02/12 at 3:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या पटेल यांच्या आर्थिक व जमीन व्यवहाराची चौकशी ईडी करणार आहे. यापुर्वीही पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, तेव्हा पटेल चौकशीला गेले नव्हते. दरम्यान, इक्बाल मिर्चीचे ISI शी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

प्रफुल पटेल यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावला जाणार आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात पुन्हा एकदा समन्स बजावला जाणार असून, त्यांना ईडी कार्यालयात आता हजेरी लावावी लागणार आहे. यापूर्वीसुद्धा प्रफुल पटेल यांना समन्स पाठवण्यात आला होता, मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती मिळालीय. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळेच ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात ईडीने नुकतंच एक आरोपपत्रं दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं. या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये ईडीने इक्बाल मिर्चीच्या घरावर कारवाई केली होती. यावेळी ईडीने त्याची प्रचंड संपत्ती जप्त केली होती. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली होती.

ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात 9 डिसेंबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची कोर्टाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #PrafulPatel's #difficulties #increased #EDwillinvestigate, #प्रफुलपटेल #अडचणी #वाढल्या #ईडीकरणार #चौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर बोचरी टीका, भ्रष्ट नेत्याच्या हस्ते उदघाटन म्हणजे अपमान
Next Article जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीची सूत्रे हाती घेणार तरुण उद्योजक, 20 टक्के कामगार कपात करणार

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?