मुंबई : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवारी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन होणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही राजकारणातील मोठी घडामोड ठरणार आहे. वंचित आघाडीच्या अधिकृत ट्वीटर हँडलरवरून ही घोषणा करण्यात आली आहे.
https://twitter.com/VBAforIndia/status/1404734278634668032?s=19
छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात मराठी क्रांती मुक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत.
छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे देखील कोल्हापूरला जाणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404767951329189890?s=19
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे.आंदोलनाच्या आधी त्यांनी आज शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसंच उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनापूर्वी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय.कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार असून यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404746974063063041?s=19
बहुजन समाज एकाच छताखाली राहिल. मला शाहू महाराजांचा आणि त्यांना (प्रकाश आंबेडकर) बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो आहे. राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांना भेटलो आहे. शेवट प्रकाश आंबेडकरांकडूनच केला आहे. आता राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे,” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404717506225262593?s=19
प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “शरद पवार यांचं राजकारण मी ४० वर्षापासून जवळून पाहत आलोय. ते नरो वा कुंजरो वाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404692736976949251?s=19