Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी प्रवीण तरडेंनी निर्माण केला वाद; काय झाले वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

श्री गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी प्रवीण तरडेंनी निर्माण केला वाद; काय झाले वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 8:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पाचं आगमन होत आहे. मात्र अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेच्या कृत्यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. तरडे यांनी यावर थेट सोशलमीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी साहित्य मिळालेली नाहीत. यामुळे अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवून बाप्पाचं स्वागत करत आहे. प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी तरडेंनी गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटलं आहे.
तरडेंची कल्पना नेटकऱ्यांना काही आवडली नाही. हा फोटो पाहिल्यानंतर तरडेंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, तरडेंनी टीका होत असलेली पाहून नंतर ती पुस्तक बाप्पाच्या फोटोची पोस्टच डिलीट केली आहे. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

* काय झालं होतं?

प्रवीण तरडे नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुस्तक गपणती ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केलं होतं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले.

* जाहीर माफीनामा; पोस्ट केली डिलीट

टीका होऊ लागल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली. सोबतच माफी मागणारा एक व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. पण मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, तसंच ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागतो”.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #प्रवीणतरडे #संविधान #वाद #माफी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदी हटवा; केंद्र सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन, केंद्राने राज्यांना फटकारले
Next Article किर्ती गोल्ड तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना लातूर जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?