Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रिसिजन गप्पा’, १३ व्या पर्वाचे ऑनलाईन प्रक्षेपण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

२२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रिसिजन गप्पा’, १३ व्या पर्वाचे ऑनलाईन प्रक्षेपण

Surajya Digital
Last updated: 2021/10/16 at 1:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या २२, २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी ‘प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १३ वे पर्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसिकश्रोत्यांना घरबसल्या ‘प्रिसिजन गप्पां’चा आनंद घेता यावा या उद्देशाने यंदाच्या सलग दुसऱ्या वर्षीही हा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत २०२१ सालच्या ‘प्रिसिजन गप्पां’बाबत माहिती दिली.

शुक्रवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी ‘म्युझिक कॅफे’ हा अनोखा सांगितिक कार्यक्रम अनुभवता येईल. भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टी हा यूट्यूब चॅनल आणि त्यांचा अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या संकल्पनेबद्दल मानसी जोशी, सारंग साठे, निपुण धर्माधिकारी यांच्या रंगलेल्या भन्नाट गप्पा रसिकांना ऐकायला मिळतील. प्रतिश म्हस्के, अजय वव्हाळ, स्वप्नील तर्फे, तुषार तोत्रे, विराज आचार्य, दुष्यन्त देवरुखकर या अभंग रिपोस्टच्या टीमने सादर केलेला ‘म्युझिक कॅफे’ यंदाच्या गप्पांचं वैशिष्ट्य ठरेल.

शनिवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी तळमळीने सामाजिक कार्य करणाऱ्या दोन संस्थांना गौरविण्यात येईल. मतीमंद मुलींना ‘स्वआधार’ देत मायेचं पांघरूण घालणाऱ्या तुळजाई प्रतिष्ठान (उस्मानाबाद) या संस्थेला २०२१ सालचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह आणि रुपये तीन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने शहाजी चव्हाण हे स्वीकारतील. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपर्यंत भोजन पोहोचवून सातत्यपूर्ण अन्नसेवा करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीला (सोलापूर) २०२१ सालचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सन्मानचिन्ह आणि रुपये दोन लाख अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने हिंदुराव गोरे हे स्वीकारतील. रॉबिनहूड आर्मी आर्थिक मदत किंवा देणगी स्वीकारत नाही. त्यामुळे पुरस्काराची रक्कम रॉबिनहूड आर्मीच्या उपक्रमांसाठी भोजन व्यवस्था करणाऱ्या अनिता उबाळे यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. रेणूताई गावस्कर यांच्या हस्ते यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा होईल. त्यानंतर रेणूताईंच्या उत्तुंग कार्यावर श्री. मिलिंद वेर्लेकर हे मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकतील.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या लोकप्रिय जोडीची प्रकट मुलाखत ही यंदाच्या गप्पांमधील पर्वणी असेल. रविवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी ‘ह्रदयी वसंत फुलताना’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या दांपत्याची वाटचाल उलगडेल. ऋषिकेश जोशी यांनी सराफ दांपत्याशी साधलेल्या संवादातून रुपेरी पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक भन्नाट किस्से रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वाजता गप्पांना प्रारंभ होईल. प्रिसिजन फाउंडेशनच्या https://m.facebook.com/PrecisionFoundationSolapur/?ref=bookmarks

या फेसबुक पेजवर तसेच इन सोलापूर न्यूज व येस न्यूज या चॅनल्सवरही हा कार्यक्रम पाहता येईल. रसिकश्रोत्यांनी गप्पांची दिवाळी घरबसल्या मनसोक्त अनुभवावी असं आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Online #broadcast #PrecisionChat #13th #episode #October, #ऑक्टोबर #प्रिसिजन #गप्पा #पर्वाचे #ऑनलाईन #प्रक्षेपण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार
Next Article मुख्यमंत्री बदलणार का ? शरद पवार म्हणाले…

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?