Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून ‘धुलाई’ झालेला प्रियकर दुस-यादिवशी झाला त्या घरचा ‘जावई’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून ‘धुलाई’ झालेला प्रियकर दुस-यादिवशी झाला त्या घरचा ‘जावई’

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 8:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : प्रेयसीला रात्री भेटायला गेल्यावर तिच्या कुटुंबीयांच्या तावडीत सापडल्यावर प्रियकराची काय आरती होणार आहे का, नाही यथेच्छ धुलाईच होणार आहे. झालेही असेच पण उत्तर प्रदेशात एका प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रेयसीला रात्री तिच्या घरी भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो आणि सकाळी तो त्या घराचा जावई बनतो. चित्रपटात शोभावी, अशी ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये घडली आहे. रामपूरमध्ये रात्री प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सापडतो. त्याला बघून संतप्त झालेले प्रेयसीचे कुटुंबीय रात्रभर त्याला बेदम मारहाण करतात.

त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते. त्यानंतर मारहाणीचा खटला दाखल होण्याची भीती असल्याने काहीजण समझौत्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यामुळे रात्रभर प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला प्रियकर त्या घराचा जावई बनतो, अशा प्रकारे या प्रेमप्रकरणाचा शेवट गोड झाला आहे.

स्वारमधील नगली गावातील तरुणाचे सुमालीतील लक्ष्मीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यासाठी नेहमी तिच्या घरी जात होता. मात्र, शुक्रवारी तो मध्यरात्री तिला भेटायला गेला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. मुलीच्या खोलीत तिचा प्रियकर सापडल्याने संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणाची रात्रभर धुलाई केली. घरातील आरडाओरडा ऐकून आजूबाजुचे शेजारीही जमा झाले. त्यांनीही त्या प्रियकराला रात्रभर झोडपले. त्यानंतर सकाळी पोलिसांना बोलवण्यात आले.

* खटला, मानहाणीमुळे झाला समझौता

प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात मारहाणीचा खटला दाखल करण्याचा विचार केला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. मारहाणीचा खटला दाखल होण्याची आणि बदनामीची भीती असल्याने दोन्ही पक्षांमध्ये समझौत्यासाठी काहीजणांनी पुढाकार घेतला. त्यांच्यात चर्चा करण्यात आली.
मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळील एका मंदिरात दोघांचे लग्न करण्यात आले. रात्रभर मुलीच्या कुटुंबीयांकडून धुलाई झालेला तरुण सकाळी त्याच घराचा जावई बनला होता आणि प्रेमप्रकरणाचा शोवट गोड झाला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #रात्रभर #प्रेयसीच्याकुटुंबीयांकडून #धुलाई #प्रियकर #दुस-यादिवशी #त्याघरचा #जावई'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; पुन्हा सरकार पडण्याचे केले भाकीत
Next Article वाढत्या कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान मोदींनी बोलावली उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?