Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

admin
Last updated: 2025/05/22 at 3:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी श्री. शिंदे आले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर या उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्माचे, संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील 12 ज्योर्तिलिंगांचा जीर्णोध्दार त्यांनी केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणी, अनेक ऐतिहासीक धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातुन घडलीत, अशी माहिती श्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रामात यापुर्वी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचे त्यांनी यावेळी सांग‍ितले.

याच महिन्यात 6 मे रोजी अहिल्यानगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देत श्री शिंदे यांनी सांगितले, या मंत्री मंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तामिळनाडू : भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू
Next Article मुंबई विमानतळावर 90,000 अमेरिकन डॉलर्स रोकड, 22 लाखांचे सोने जप्त

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?