Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

“आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग”

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 4:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जळगाव : भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. जळगाव वसतिगृह प्रकरणावरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याची टीका करताना आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचं म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत नवाब मलिक यांनी मुनगंटीवार धमकावत असल्याचा आरोप केला

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून तिला नग्न नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. यावरूनच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

जळगाव वसतिगृहात घडलेल्या प्रकारावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सरकार या प्रकरणात काहीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपावरून मुनगंटीवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले की, सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरे समोर आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातं आहे आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात.

तसेच सभागृहात इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितले पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावे लागेल अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला होता.

* दोन दिवसांत कारवाई – अनिल देशमुख

“जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचं काम सुरु आहे. व्हिडीओ तसंच इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दोन दिवसांत कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी याआधी बोलताना दिलं होतं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Presidential #rule #only #mockmother #sister, #आई-बहिणीची #थट्टा #होणार #राष्ट्रपती #राजवट #मार्ग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कारवाईने बॉलिवूडमध्ये खळबळ, अनुराग कश्यप व तापसी पन्नूच्या घरावर धाड
Next Article पोलिसांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?