Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधानांनी केली अपघातस्थळाची पाहणी, जखमी प्रवाशाची घेतली भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधानांनी केली अपघातस्थळाची पाहणी, जखमी प्रवाशाची घेतली भेट

admin
Last updated: 2025/06/13 at 2:29 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहमदाबाद, 13 जून (हिं.स.) गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १३) सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. १३) सकाळी पंतप्रधान मोदी विशेष विमानाने अहमदाबाद येथे दाखल झाले. तेथून ते थेट विमान कोसळलेल्या दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बचावकार्य, मदतकार्य आणि तपासाची सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळाच्या पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तेथे त्यांनी विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशाची भेट घेतली. डॉक्टरांकडून त्यांनी जखमी व्यक्तीच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मदतकार्य आता थांबले आहे. अपघाताबाबत एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. एअरलाइनने म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी वाचला आहे, ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघाताच्या चौकशीत आता यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीबीएस ) देखील सामील होईल. एनटीबीएस ने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये माहिती दिली आहे की ते तज्ञांची एक टीम भारतात पाठवत आहे, जी भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) सोबत या अपघाताच्या चौकशीत सहकार्य करेल.अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी भारतातील एअर इंडिया विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भारतातील अपघातामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही अपघाताच्या चौकशीत भारताला मदत करण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळासोबत काम करत आहोत.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे तपासक अपघातस्थळी तैनात आहेत.पुढे त्यांनी म्हणलं आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक डेटा मिळविण्यासाठी आम्ही अतिरिक्त संसाधने पाठवण्यास तयार आहोत. एफएएने तपासाचा भाग म्हणून आवश्यक माहितीची पुनरावलोकन करण्यासाठी बोईंग आणि जिईला आधीच नियुक्त केले आहे. एनटीबीएस तपासाचे नेतृत्व करत असल्याने, आम्ही कोणत्याही सुरक्षा शिफारसी लागू करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आम्ही सुरक्षिततेला प्राधान्य देऊ.”

—————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन
Next Article इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी, परमाणु शास्त्रज्ञ ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?