Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

admin
Last updated: 2025/06/16 at 4:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 16 जून (हिं.स.) : परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज, सोमवारी सायप्रसमध्ये सन्मानित करण्यात आले. सायप्रसचे पहिले अध्यक्ष मकारिओस- III यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ अकारिओस- III हा पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात आला. भारताचे परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

राष्ट्र सेवेत प्रशंसनीय सेवेसाठी एखाद्या देशाचे प्रमुख किंवा इतर महत्वाच्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान केला जातो. निकोसिया येथील राष्ट्रपतींच्या निवासस्‍थानी आयोजित कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्‍कार प्रदान केला. या सन्‍मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रिस्टोडोलाइड्स यांच्‍यासह सायप्रसच्या जनतेचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, “सायप्रसमधील सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III या पुरस्‍कारानेमाझा सन्‍मान करण्‍यात आला याबद्‍दल मी सायप्रस सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नाही, तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा त्यांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक बंधुत्वाचा आणि “वसुधैव कुटुंबकम” च्या विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आपल्या सामायिक मूल्यांना आणि परस्पर समंजसपणाला समर्पित करतो. सर्व भारतीयांच्या वतीने मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारतो असे मोदींनी सांगितले.

ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III हा सन्मान शांतता, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीप्रती असलेल्या आपल्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मी या सन्मानाचे महत्त्व समजतो आणि भारत आणि सायप्रसमधील संबंधांप्रती असलेली जबाबदारी म्हणून तो स्वीकारतो. भविष्‍यात भारत आणि सायप्रसमधील भागीदारी नवीन उंची गाठेल. एकत्रितपणे, आपण केवळ आपल्या दोन्ही राष्ट्रांची प्रगती मजबूत करू शकत नाही तर शांततापूर्ण आणि सुरक्षित जागतिक वातावरण निर्माण करण्यातही योगदान देऊ, असा विश्‍वासही मोदींनी यावेळी व्‍यक्‍त केला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
Next Article राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?