अमरावती, 9 ऑगस्ट –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी खासगी उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. अर्ज क्रमांक 17 भरून नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज, मार्गदर्शक पुस्तिका आणि सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध आहेत तसेच संबंधित विभागीय मंडळाकडूनही माहिती मिळू शकते.
नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळा/ज्युनिअर कॉलेजचा सांकेतिक क्रमांक, विषय, योजना, माध्यम, शाखा यांसह आवश्यक माहिती आधीच तयार ठेवावी. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावा लागेल.
शुल्क संरचना:
-
नावनोंदणी शुल्क : ₹1,100
-
प्रक्रिया शुल्क : ₹100
-
विलंब शुल्क : ₹100 (अंतिम तारखेनंतर अर्ज भरल्यास)
सर्व शुल्क ऑनलाईनच भरावे लागेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.