Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Police recruitment राज्यात 7 हजार 231 पदांची पोलिस भरती, लवकरच होणार प्रक्रिया पूर्ण 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

Police recruitment राज्यात 7 हजार 231 पदांची पोलिस भरती, लवकरच होणार प्रक्रिया पूर्ण 

Surajya Digital
Last updated: 2022/06/29 at 9:10 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ असे असणार गुण आणि वे॓ळ□ ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलिसांना 25 लाखात घर

मुंबई  :  राज्यात लवकरच 7 हजार 231 पदांची पोलिस भरती केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यासंबंधीचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, असेही ते म्हणाले. लवकरच या संबंधीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. Police recruitment for 7 thousand 231 posts in the state of Maharashtra, the process will be completed soon Dilip Walse-Patil Home Ministry

 

 

 

एकीकडे एकनाथ शिंदे यांचे बँड चालू असताना राज्य सरकार धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीतही मुख्यमंत्र्यांनी आपले काम सुरूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7 हजार 231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

 

 

 

पोलीस दलात भरती प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाणार आहे. भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार, तर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार 231 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार असून उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

 

राज्य सरकारने पोलीस शिपाई संवर्गातील 7 हजार 231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी ओएमआर (ऑप्शनल मार्क रेकहनायझेन) आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया लांबली होती. राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या दुरुस्तीचा फायदा पोलीस दलास होणार असून त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

 

□ असे असणार गुण आणि वे॓ळ

 

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5कि.मी. धावणे (50गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

 

 

शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल.

 

 

तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR  पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

 

□ ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलिसांना 25 लाखात घर

#house #घर
#police  #पोलीस #ठाकरे #सरकार #निर्णय

ठाकरे सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार BDD चाळीतील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घरं 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील, असं आव्हाड यांनी सांगितलं.

 

You Might Also Like

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

देशात कोरोनाचे १०४७, तर राज्यात ६६ नवीन रुग्ण

कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू

मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

TAGGED: #Police #recruitment #7thousand #posts #state #Maharashtra #process #completed #soon #DilipWalse-Patil #HomeMinistry, #राज्य #महाराष्ट्र #पद #पोलिस #भरती #लवकरच #प्रक्रिया #पूर्ण  #गृहमंत्री #दिलीप वळसे-पाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिका आयुक्त 10 दिवस रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार 
Next Article Solapur murder नातवानेच केला आजीचा खून; नातवाला अटक; सुनावली पोलीस कोठडी

Latest News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News May 28, 2025
अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
देश - विदेश May 28, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
देशात कोरोनाचे १०४७, तर राज्यात ६६ नवीन रुग्ण
महाराष्ट्र May 28, 2025
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र May 28, 2025
मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी
महाराष्ट्र May 28, 2025
राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ
महाराष्ट्र May 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?