Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सैनिक विधवा पत्नीच्या नावे असलेला मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सैनिक विधवा पत्नीच्या नावे असलेला मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव

Surajya Digital
Last updated: 2021/02/19 at 7:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्यातील सैनिकांच्या २ हजार ८२० विधवा पत्नींच्या नावे असलेला मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात जवळपास ७ हजार माजी सैनिक आहेत. त्याचबरोबर आजी सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागात रक्षणासाठी तैनात आहेत. जिल्ह्यात सैनिकांच्या विधवा पत्नींची संख्या २ हजार ८२० इतकी असून, त्यांच्यावर २८ हजार ९३२ जणांचा उदरनिर्वाह आहे.

माजी सैनिक, सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्ता करात सूट देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा २३ नाेव्हेंबर २०२० चा अध्यादेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नवीन सैनिकांचा शोध माजी सैनिक कल्याण कार्यालय व संघटना यांच्याकडून आलेली प्रकरणे व ज्या त्या ग्रामपंचायत हद्दीतील सैनिकांचाही शोध घेण्यात यावा. २५ फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये खास सैनिकांच्या प्रश्नांसाठी शिबिर घेतले जाणार आहे.

* एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम

सैनिकांची जिल्हा परिषदेकडे वेगवेगळी प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. या कामासाठी त्यांना सुटी काढून यावे लागत आहे. त्यामुळे सैनिक व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा सन्मान झाला पाहिजे, या भावनेतून जिल्हा परिषदेतर्फे एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात प्रत्येक विभागाला त्यांच्याकडे सैनिकांची प्रलंबित असलेली कामे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्य सैनिक, आजी, माजी सैनिक, शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयाच्या जागा, घरबांधकाम, मालमत्ताकर, प्रमाणपत्र, नाहरकत अशी प्रकरणे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असतील तर त्यांनी तातडीने मार्गी लावावीत, असे विभागप्रमुखांना कळविण्यात आल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Proposal #waiveproperty #taxinthename #soldierwidow, #सैनिक #विधवापत्नीच्या #नावेअसलेला #मालमत्ता #करमाफ #करण्याचा #प्रस्ताव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पेट्रोल दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहा, छातीत कळ आल्यास मालक जबाबदार नाही’
Next Article ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?