Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय, भागिदारीत चालू केला होता व्यवसाय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय, भागिदारीत चालू केला होता व्यवसाय

Surajya Digital
Last updated: 2021/02/24 at 6:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापुरात गॅलेक्सी स्पा अँड वेलनेस या मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. येथील भागवत थिएटर परिसरात महिन्याभरापूर्वी हे पार्लर सुरू झाले आहे.

पोलिसांनी मिझोराम व नागालँड येथून आलेल्या 7 मुलींसह 10 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मालक अनिल जाधव (रा. अशोकनगर, विजापूर रोड, सोलापूर) व विशाल कांबळे (रा. जत, जि. सांगली) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मॅनेजर सागर सुनील शिरसोडे (वय 26, रा. सिद्धेश्‍वरनगर, मजरेवाडी) व कामगार परशुराम दत्तात्रय वाघमारे (वय 20, रा.सिद्धेश्‍वर पार्क, जुळे सोलापूर) यांना अटक केली आहे.

शहरात नागरी वस्त्यांमध्ये काही ठिकाणी छुपे वेश्या अड्डे सुरू आहेत.याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली. त्याठिकाणी वेश्या अड्डा सुरू असल्याची खात्री झाली. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कुंभार व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास या मसाज पार्लरवर छापा टाकला. छाप्यावेळी पोलिसांना पार्लरमध्ये मिझोरम व नागालँड येथून आलेल्या 7 मुली आढळून आल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यातील दोन महिलांना पोलिसांनी ग्राहकांसोबत रंगेहात पकडले. भरवस्तीत पार्लरच्या नावे सुरू असलेला हा वेश्या अड्डा चव्हाट्यावर येताच शहरात एकच खळबळ उडाली. कारवाईदरम्यान बघ्यांचीही गर्दी झाली होती. पैशाच्या आमिषाने मसाजचे काम देऊन परराज्यांतून आणलेल्या मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या सात मुलींची पोलिसांनी सुटका केली.

* भागिदारीत चालू होता मसाज पार्लर

भागवत थिएटर परिसरात पहिल्या मजल्यावर महिन्यापूर्वी अनिल जाधव व विशाल कांंबळे यांनी भागिदारीत गॅलेक्सी स्पा अँड वेलनेस हे मसाज पार्लर सुरू केले होते. त्यांनी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला होता. त्यासाठी मिझोरम, नागालँड येथून सात मुली आणल्या आहेत.

याप्रकरणी मालक अनिल जाधव व विशाल कांबळे, मॅनेेजर सागर सुनील शिरसोडे, सफाई कामगार परशुराम वाघमारे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. शिरसोडे व वाघमारे या दोघांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Prostitution #massageparlor #business #started #partnership, #मसाजपार्लरमध्ये #वेश्याव्यवसाय #भागिदारीत #चालू #व्यवसाय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ब्रेकींग : उद्यापासून रात्री सोलापुरात संचारबंदी तर ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद
Next Article खूशखबर ! बळीराजाला मिळणार जिल्हा बँकेतून दोन – पाच लाखांचे मॉरगेज कर्ज

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?