Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

Surajya Digital
Last updated: 2023/01/25 at 10:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ ‘झाला कहर, पांडुरंग सावर’ घोषणेने पांडुरंगाला साकडेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ ‘झाला कहर, पांडुरंग सावर’ घोषणेने पांडुरंगाला साकडे

 

पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घालून “झाला कहर पांडुरंग सावर” या घोषणेने २६ जानेवारी रोजी येथील ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर सांगोला रोड पंढरपूर येथून शेतकऱ्यांचे जनजागरण करण्यासाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये २ फेब्रुवारीपर्यंत जनजागरण सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. Public awareness week campaign of farmers organization from Pandhari Pandharpur Solapur Satara Kolhapur Sangli Pune Raghunath Patil

 

यावेळी शिवाजीराव नांदखिले, रामभाऊ सारवडे, संभाजी पवार, पांडुरंग मारवाडकर, सुनील बिराजदार, रघुनाथ शितोळे, नामदेव जानकर,बाळासाहेब वाळके यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

सदरची अभियान २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, महाराष्ट्रावर लागलेली शेतकरी आत्महत्येचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेतकरी संघटना कार्यरत आहे. सामान्य जनतेच्या शोषणाची गती वाढल्याने गरिब हा गरीबच राहिला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. धन दांडग्यांना कच्चा माल लागत असल्याने शेतमालावर निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या अर्धे पैसे हमीभाव म्हणून मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  याला दोन्हीही सरकारचे धोरण कारणीभूत आहे. सरकार बदलून चालणार नाही. शेतकऱ्यांबाबतचे धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, की देशात धार्मिक भावना व इतर विषयांवर मोठा उद्रेक पाहावयास मिळतो, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्ष गप्प आहेत. देशात अब्जाधीश उद्योगपतींचे प्रमाण वाढले आहे. परंतु बेरोजगारी, भूकबळी, गरिबी आदी कारणाने देश मागे चालला आहे. यामुळे सर्वत्र कहर माजला असल्याने आम्ही “झाला कहर पांडुरंगा सावर”अशी घोषणा देऊन पांडुरंगाला शेतकरी संघटनेच्या वतीने साकड घालून २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पंढरपूरसह, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या भागातील शेतकऱ्यांची जनजागृती करणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात

सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून!

सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीओईपीतील नव्या इमारतीचे उद्घाटन

सोलापुरात रेशनच्या तांदूळमध्ये आढळला मृत साप

TAGGED: #Public #awarenessweek #campaign #farmers #organization #Pandhari #Pandharpur #Solapur #Satara #Kolhapur #Sangli #Pune #RaghunathPatil, #पंढरी #पंढरपूर #26जानेवारी #शेतकरी #संघटना #जनजागरण #सप्ताह #अभियान #सातारा #कोल्हापूर #सांगली #पुणे #रघुनाथपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत
Next Article तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतताना सोलापुरातील चौघांचा मृत्यू

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?