अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।
अमरावती येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा नुकताच पार पडला,त्या मेळाव्यात पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे सरकार भगव्यातील सैतान असल्याचे बेताल वक्तव्य केल्याने शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट व महानगर प्रमुख संतोष बंद्रे यांच्या नेतृत्वात अमरावती येथे आ.नितीन देशमुख यांच्या पुतळ्याला चपला मारून पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला व असे बेताल वक्तव्य पुन्हा खपून घेतले जाणार नाही,असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट,महानगर प्रमुख संतोष बंद्रे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखा खारोडे,अरुणा इंगोले,जयश्री कातखेडे,शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार,सारिका जैस्वाल,युवती सेना जिल्हाप्रमुख कोमल बद्रे आदी शिवसैनिक उपस्थित होते.