Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाहनाच्या पीयुसीचे दर दुप्पट-तिप्पटीने वाढणार; दरवाढ १ अॉक्टोबरपासून लागू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

वाहनाच्या पीयुसीचे दर दुप्पट-तिप्पटीने वाढणार; दरवाढ १ अॉक्टोबरपासून लागू

Surajya Digital
Last updated: 2020/09/23 at 2:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे :  आर्थिक तोटा सहन करावा लागत असून पीयुसी केंद्र चालविणेही कठीण होत असल्याचा दावा ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे त्यांनी पीयुसीचे दर दोन ते तीन पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू केली जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने मागील दहा वर्षांपासून ‘पीयुसी’चे दर वाढविले नाहीत. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे चालकांचा खर्च वाढला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पीयुसीसाठी ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली. त्यानंतर मागील कोरोनामुळे २२ मार्चपासून पीयुसी सेंटर बंद होते. त्याचा फटका चालकांना बसला आहे. अनेकांनी कर्ज काढून नवीन पीयुसी मशीन घेतले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ऑनलाईनमुळे इंटरनेटचा खर्च वाढला आहे. पण शासनाने दरवाढ न केल्याने  २०११ च्या दराप्रमाणेच पीयुसीचे वितरण केले जात आहे. सध्या बहुतेक वाहने बीएस ४ असल्याने त्यांना १ वर्षाचे पीयुसी देणे बंधनकारक आहे. यापूर्वी किमान सहा महिन्यांचे पीयुसी देण्यात येत होते. त्यामुळे आता वाहनधारक पुन्हा वर्षानेच येणार आहेत. ऑनलाईनमुळे वेळही अधिक लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले

* कारवाई केल्यास पीयुसी केंद्र बंद ठेवू

खर्च वाढलेला असल्याने संघटनेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनालाही कळविण्यात आले आहे. त्यांनी हे दर मान्य करणे अपेक्षित आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पीयुसीचे दर ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला नाहीत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून संघटनेकडूनच दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचा खर्चानुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. या विरोधात शासनाने कारवाई केल्यास आम्ही राज्यातील सर्व पीयुसी केंद्र बंद ठेवू, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

* एक नजर : सध्याचे दर कंसात वाढणारे दर

दुचाकी ३५ (१००)
तीनचाकी ७० (१५०)
चारचाकी (पेट्रोल) ९० (२००)
चारचाकी (डिझेल) ११० (३००)
सर्व अवजड वाहने ११० (४००)

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #तोटा #सहन #पीयुसी #दरवाढ #दुप्पटतिप्पट #ऑलपीयुसीसेंटरओनर्सअसोसिएशन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मटका प्रकरणात अखेर नगरसेवक सुनील कामाठीला अटक; २८८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Next Article बाद घोषित केल्यानंतरही पंचांनी टॉम करनला परत बोलावल्याने धोनी संतप्त

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?