Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात भीषण अपघात, ट्रेलरने आठ वाहनांना उडवले, दोन ठार तर सात जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात, ट्रेलरने आठ वाहनांना उडवले, दोन ठार तर सात जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/29 at 11:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी, २ दुचाकी व एक रिक्षा अशा ८ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. आठ वाहनांना उडविल्यानंतर नवले पुलाच्याजवळ या ट्रेलरला आग लागली होती. हा अपघात आज रविवारी सायंकाळच्या सुमारास झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले.

या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे( वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे ( वय ३२, रा. उस्मानाबाद) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी जखमी असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास २२ चाकी ट्रेलर सातारा बाजूकडून ४१ टन लोखंड घेऊन मुंबई बाजूकडे जात होता. भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे चाललेल्या ८ वाहनांना एका पाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. तसेच त्यानंतर ट्रेलरची पुलावरील कठड्याला धडक बसल्याने ट्रेलर ने पेट घेतला.

माहिती मिळताच पीएमआरडी व पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रेलरने धडक दिल्याने रिक्षाचालक बाहेर पडले. तेव्हा बाजूने जाणाऱ्या वाहनांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अनेक जण अडकून पडले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलर चालक प्रेमराज बिष्णोई ( वय २५, रा. जोधपूर, राजस्थान) याला नागरिकांनी पकडून जोरदार मारहाण केली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #पुणे #भीषणअपघात #ट्रेलरने #आठवाहनांना #उडवले #दोनठार # सातजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैराग रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, चालक – प्रवाशी व बसचालक जखमी
Next Article नवीन वर्षात पीयूसी नसेल तर वाहनाचे आरसी जप्त होणार

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?