Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे महापालिकेत मोठा कल्ला; भाजप आणि राष्ट्रवादी भिडली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पुणे महापालिकेत मोठा कल्ला; भाजप आणि राष्ट्रवादी भिडली

Surajya Digital
Last updated: 2021/01/01 at 8:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि श्रेयवादावरुन मोठा कल्ला झाला. भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच हा प्रकार घडला. सभागृहाबाहेर  राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विशेष म्हणजे एवढा कल्ला होऊनही, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या कोणत्याच प्रमुख नेत्याने या गोंधळावर भाष्य केलं नाही. माध्यमांना टाळत हे सर्वजण कार्यक्रम आटोपल्यानंतर निघून गेले.

भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

अजित पवार व फडणवीस यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. करोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.

* कार्यकर्त्यांचा आपआपला दावा

भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली. या प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाले असताना आता काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. या प्रकल्पाचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवं. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच पूर्णत्वास आला आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. विरोधी पक्षनेते फडणवीस येथे आले असताना भाजपचे कार्यकर्ते गिरीश बापटांच्या नावाने घोषणा देत आहेत. त्यावरून ही घोषणाबाजी भाजपातीलच गटबाजीचे दर्शन घडवणारी होती, असेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #पुणे #महापालिकेत #मोठाकल्ला #भाजप #राष्ट्रवादी #भिडली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत करोनाचा कहर, ४८ तासात सात हजारांहून अधिकजणांचा बळी
Next Article उपमुख्यमंत्री पवारांनी केले अभिवादन, जयस्तंभ विकास आराखडा मंजूर

Latest News

По какой причине индивидам приятно смотреть за ходом сторонним риском
Top News December 16, 2025
Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?