पुणे, 31 मार्च (हिं.स.)।
सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी भागातील एका ३८ वर्षीय महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविण्यात आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.