Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्रीमंत दगडूशेठचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा होणार; गणरायाचे यंदा ऑनलाईन दर्शन आणि आरती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

श्रीमंत दगडूशेठचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा होणार; गणरायाचे यंदा ऑनलाईन दर्शन आणि आरती

Surajya Digital
Last updated: 2020/08/11 at 12:07 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे :  पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही मंडळाने यावेळी स्पष्ट केले.

उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आला आहे.

* एलईडी स्क्रिनसह कॅमेऱ्यांचे सुरक्षाकवच

गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये आणि परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जात आहेत.

* गणरायाचे ऑनलाईन दर्शन आणि आरती

यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने मंडळामार्फत ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष या विषयावर प.पू. स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण,  ११ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील १८ ऑगस्टपासून सकाळी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी साडेसात आणि रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे.

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्ट मार्फत करण्यात आली असून वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील अशोक गोडसे यांनी केले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #पुणे #दगडूशेठगणपती #यंदाकोरोना #मंदिरातच #अॉनलाईनदर्शनआरती #मंडळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणेकरांना दिलासा : पाणीकपात टळली; संततधार पावसामुळे चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा
Next Article आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भारत गॅस सिलिंडर बुक करा ; सात कोटी ग्राहकांचा होणार घरबसल्या फायदा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?