Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारीपदी साळुंके तर ज्योती पाटील यांची कोरेगावला बदली, आणखी बदल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारीपदी साळुंके तर ज्योती पाटील यांची कोरेगावला बदली, आणखी बदल्या

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 12:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : सोलापूरच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची कोरेगावच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार विवेक साळुंके यांची बदली सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील चार उपजिल्हाधिका-यांच्या बदल्या झाली असून पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण बसणार याचा सस्पेन्स आणखी कायम आहे.

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण बसणार याचा फैसला मात्र अद्याप झालेला दिसत नाही. पुणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. तर भुदरगडचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची बदली सोलापूर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे यांची सातारा येथे पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

साताऱ्यातील पुनर्वसन तहसीलदार शुभांगी फुले यांची पुणे येथे सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. तर उपप्रबंधक एमआरटी तहसीलदार दिगंबर रौंदळ यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे.

पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार सुरेखा दिवटे यांची विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन कार्यालयात बदली झाली आहे. तर आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांची सोलापूर येथे सर्वसाधारण शाखेत बदली करण्यात आली आहे.

* पुणे जिल्हाधिकारी पदी कोण ?

कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावर कुणाची नियुक्ती होणार यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.   पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश देशमुख, तर शिवसेनेकडून जी श्रीकांत, अस्तिक कुमार पांडे यांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे. कुणाल खेमनार यांची नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचंही नाव नव्यानं चर्चेत आलं आहे.

You Might Also Like

छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे

आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड

सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

TAGGED: #ज्योतीपाटील #विवेकसाळूंखे #उपजिल्हाधिकारी #पुणे #जिल्हाधिकारी #कोणबसणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव; दोघांचा मृत्यू तर 110 जण अटकेत
Next Article सोलापूर महापालिका उपायुक्तपदी रुजू न झालेले अधिकारी बापट यांची पुन्हा साता-यात नियुक्ती

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?