Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 29 जणांचा बळी; वाचा घराची पडझड, पिकांचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 29 जणांचा बळी; वाचा घराची पडझड, पिकांचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2020/10/17 at 10:01 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील कोल्हापूर वगळता सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये 29 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आठ जण बेपत्ता आहेत. वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे 40 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. 87 हजार 416 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुणे विभागातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्याला बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्‍यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे आणि भिंत पडून पुणे जिल्ह्यात सात, सातारा दोन, सांगली सहा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुणे जिल्ह्यात एकजण बेपत्ता आहे.

पुणे विभागात दोन हजार 4156 घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे विभागातील 40 हजार 036 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

* पडझड झालेल्या घरांची संख्या :

पुणे 13
सातारा 267
सांगली 323
सोलापूर 1716

* जिल्हानिहाय पिकांचे नुकसान,
हेक्‍टरमध्ये :

पुणे : ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात (18 हजार 746 हेक्‍टर)
सातारा : भात, भाजीपाला, ऊस आणि सोयाबीन ( एक हजार 420 हेक्‍टर)
सांगली : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (आठ हजार 276 हेक्‍टर)
सोलापूर : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (58 हजार 581 हेक्‍टर)
कोल्हापूर : भात, ऊस, भुईमूग, सोयाबीन (393 हेक्‍टर)

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #पुणेविभाग #29जणाचाबळी #घराचीपडझड #हेक्टरमध्ये #पिकांचेनुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तासगावात एक हजाराच्या लाचेप्रकरणी सहाय्यक पोलीस अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Next Article हल्दीराम कंपनीवर सायबर हल्ला; केली सात लाखांची मागणी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?