पुणे, 13 जून, (हिं.स.)। अवजड वाहनांमुळे शहरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत गंभीर स्वरुपाच्या अपघातास असलेल्या अवजड वाहनांची माहिती संकलित करण्यात येणार असून, अशी वाहने जप्त करण्यात येणार आहेत. संबंधित वाहनचालकांचा परवानाही रद्द केला जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दीपाली सोनी या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात दीपालीचे सासरे गंभीर जखमी झाले. शहरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवजड वाहने, तसेच चालकांवर कडक कारवाईचा इशारा दिला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असताना अनेक वाहनचालक वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, तसेच गंभीर अपघात होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत