Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यास दुहेरी मुकुट; मुंबई उपनगर ठाणे उपविजेते, उस्मानाबाद तृतीय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

पुण्यास दुहेरी मुकुट; मुंबई उपनगर ठाणे उपविजेते, उस्मानाबाद तृतीय

Surajya Digital
Last updated: 2021/12/14 at 6:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा : प्रतीक वाईकर व प्रियांका इंगळे अनुक्रमे राजे संभाजी व राणी अहिल्या पुरस्काराचे मानकरी

सोलापूर : पुण्याच्या पुरुष व महिला संघानी वरिष्ठ गटाच्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली. पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळविला. या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद आणि पुरुष गटात सांगलीने संपादित केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्यास ठाणेवर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. प्रियांका इंगळे (२.००,१.४० मिनिटे व ५ गुण), दिपाली राठोड (२.१०,१.०० मिनिटे २गुण) व श्वेता वाघ (१.५०, १.५०) यांच्या शानदार खेळीमुळे पुण्याने मध्यंतरास ९-५ अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या रेश्मा राठोड (१.५० मिनिटे ४ गुण), मृणाल कांबळे (४गडी) व कविता घाणेकर (२.२० मिनिटे) यांची खेळी अपुरी पडली.

पुरुष गटात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमविले. डोळ्याचे पारणे फेडलेला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता तर सर्व प्रेक्षकांचे लक्ष सामना संपल्याची पंचाची शिट्टी कधी वाजते याकडे होते. अखेर शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुण्याच्या मिलिंद करपे ( ५ गुण व १.०० मिनिटे), प्रतीक वाईकर (३गुण व १.४०) व सागर लेंग्रे (१गुण व १.४०) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे ( ५ गुण व १.१०,१.०० मिनिटे), अनिकेत पोरे (२ गुण १.३०,१.००), ऋषिकेश मुरचावडे (१गुण, १.३०,१.१०) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली.

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरी वर २३ सेकंदाने तर पुरुष गटात सांगलीने ठाणेवर ११सेकंदाने मात केली.

खो-खोचे आधारस्तंभ व महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने केले होते. पारितोषिके आमदार शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे- पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते झाला.

यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव जे. पी. शेळके आदी उपस्थित होते. स्पर्धा सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले.

सर्वोत्कष्ट खेळाडू : 

पुरुष : अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार: प्रतीक वाईकर (पुणे) संरक्षक: ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर), आक्रमक: मिलींद कुरपे (पुणे).

महिला :अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार : प्रियांका इंगळे (पुणे), संरक्षक: श्वेता वाघ (पुणे), आक्रमक : रेश्मा राठोड (ठाणे).

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Pune #double #crown #Mumbai #Suburbs #Thane #Runners-up #Osmanabad, #पुणे #दुहेरी #मुकुट #मुंबई #उपनगर #ठाणे #उपविजेते #उस्मानाबाद #तृतीय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ममतादीदींचा शरद पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा आमदार फोडला
Next Article प्रॉपर्टीच्या वादातून माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?