Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार, तळजाई बचाव अभियान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार, तळजाई बचाव अभियान

Surajya Digital
Last updated: 2021/10/10 at 6:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्याच्या तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार आहे. मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली आहे. तळजाई टेकडीवर प्रकल्पामुळे या टेकडीवर अतिक्रमण करण्यात येत आहे, ते आम्हाला मान्य नाही. म्हणून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. असे वसंत मोरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलन होणार आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले आहे. त्याची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, तळजाई टेकडीवरील प्रस्ताविक जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास सहकारनगर भागातील पर्यावरण प्रेमी, सहकारनगर नागरिक मंच, सहकारनगर बचाव अभियान या नागरिकानी गेल्या महिन्यात तळजाई टेकडीवर स्वाक्षरी मोहीम राबवून या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती आहे, त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी तळजाई बचाव अभियान मोहिम राबवली आहे. या तळजाई बचाव अभियानास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन हजार स्वाक्षरी मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. तळजाई टेकडीवर हजारो नागरिक पर्यावरप्रेमी, निसर्गप्रेमी तळजाई टेकडीवर फिरायला येतात. त्यामुळे या तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिक दृष्ट्या जशी आहे तशी राहावी,  असे पर्यावणप्रेमीं नागरिकांची भूमिका आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #RajThackeray #stage #agitation #Pune #Taljai #Bachao #Abhiyan, #राजठाकरे #पुणे #आंदोलन #तळजाई #बचावअभियान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बुधवारी पुण्यात येऊन आणखी एक पोलखोल करणार – किरीट सोमय्या
Next Article उजनी ओव्होर फ्लो ! सोळा दरवाजे उचलून २० हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?