Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ : वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करणे आणि पुढील कार्यवाही करण्याचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ : वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करणे आणि पुढील कार्यवाही करण्याचे आदेश

admin
Last updated: 2025/04/08 at 4:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा प्रस्ताव सादर करा *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणि विद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण होणार
*महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संदर्भातील प्रश्नांसंदर्भात आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे होऊन त्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग, महसूल आणि विद्यापीठ अधिकारी यांच्याशी समन्वयातून कार्यअहवाल तयार करावा. विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा निर्मितीचे कार्य कोणत्याही परिस्थितीत दिनांक १५ मे, २०२५ पर्यंत पूर्ण व्हावे तसेच ८०/२० सूत्रानुसार विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत असे निर्देश यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या संदर्भातील उपक्रम आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत असे आदेश मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बैठकीत याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टिने वनविभागाच्या अटी – शर्ती नुसार पुढील एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण व्हावी तसेच अपेक्षित कार्यवाहीच्या दृष्टिने जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी सर्व संबंधित घटकांशी चर्चा – समन्वय करुन आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा आणि पुढील कार्यवाही पूर्ण करावी,

असे यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री .चंद्रकांत दादा पाटील यांनी आदेशीत केले. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव.वेणूगोपाल रेड्डी, वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव .मिलिंद म्हैसकर, कुलगुरु प्रा.प्रकाश महानवर, दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्यासह तीनही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोबत फोटो

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जनता जागा दाखवेल : यशोमती ठाकूर
Next Article ‘त्या’ चिमुरडीच्या चौकशी प्रकरणाला‘संशया’चा वास, बदलापूरचं प्रकरण दडपलं नाही,पण सोलापूरचं दबतंय का?

Latest News

По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Živa ruleta v spletnih igralnicah v Sloveniji – Vodnik za igralce
Top News December 5, 2025
Зачем мы останавливаемся на размеренные отдых
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?