Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी

Surajya Digital
Last updated: 2021/06/16 at 6:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेत तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. याठिकाणी शिवीगाळ अन् मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे सत्ताधारी पक्षाचे खासदार अली नवाज खान विरोधी नेत्यांशी भांडणं आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेत पीटीआयच्या खासदार मालेका बुखारी यांच्या डोळ्याला जखम झाली आहे.

ملیکہ بخاری خاتون رکن اسمبلی کی آنکھ پر بجٹ بک ماری گئی ہے جس سے انکی آنکھ زخمی ہوگئی۔ ⁧#ن⁩ لیگ اراکین اسمبلی کو خواتین کی عزت اور آبرو کا بھی کوئی احساس نہیں ہے۔ pic.twitter.com/4SW6TgB23E

— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) June 15, 2021

‘राष्ट्रीय संसद आहे की मासळी बाजार.’ अशा प्रश्न विचारावा लागेल एवढा गोंधळ मंगळवारी पाकिस्तानी संसदेमध्ये पहायला मिळाला. फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन् एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न असा सारा संसदेमधील गोंधळ देशातील जनतेने वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह पाहिला.

पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. या साऱ्या गोंधळानंतर नवाज शरीफ यांच्या भावाने ट्विटरवरुन इम्रान खान सरकार आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांवर संसदेमध्ये गुंडगीरी करण्याचा आरोप केला.

कनिष्ट सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा मान सन्मान न करता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या. केवळ एकमेकांना शिव्या देऊन आणि आरडाओरड करुन समाधान झालं नाही म्हणून हे खासदार एकमेकांना मारण्याचाही प्रयत्न करत होते. पाकिस्तानी खासदारांनी एकमेकांना आया-बहिणींवरुन शिव्या दिल्याचंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला खासादारांसमोरच हा शिवीगाळ सुरु होता. पाकिस्तानी संसदेमध्ये महिला लोकप्रितिनिधींसमोरच खासदार एकमेकांबद्दल अपशब्दाचा वापर करताना दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आलं.

This is the reality of the ‘Naya Pakistan’ Imran Khan has created. This is a reflection of his fascist mindset. He will leave no stone unturned to paralyse parliament and weaken democracy. Throwing budget books at the opposition. This is Imran Khan’s ‘Riyaasat-e-Madina’. https://t.co/FaOtgaIR7Z pic.twitter.com/wQbJ895OA1

— Marriyum Aurangzeb (@Marriyum_A) June 15, 2021

पाकिस्तानमधील द डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरुन वाद झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंदू शहबाज शरीफ हे सभागृहाला संबोधित करत होते. मागील आठवड्यामध्ये इम्रान खान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पासंदर्भात शहबाज शरीफ बोलत होते. मात्र त्याचवेळी सत्ताधारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार अली अवान आणि एका विरोधी पक्षाच्या खासदाराने आरडाओरड सुरु केला. ते एकमेकांना शिव्या देऊ लागले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिव्या देतानाच अली अवान यांनी त्यांच्या हातातील पुस्तक विरोधी पक्षातील खासदाराकडे भिरकावले. त्यानंतर पाहता पाहता सर्वच खासदार एकमेकांकडे वस्तूंचा मारा करु लागले आणि संसदेला जणू युद्धभूमीचे स्वरुप आले. सोशल नेटवर्किंगवर या गोंधळाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्पीकरने असेंबलीच्या सुरक्षारक्षकांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोलवलं. मात्र सुरक्षारक्षकही या गोंधळासमोर अपुरे पडल्याचं चित्र दिसलं. त्यानंतर वरिष्ठ सभागृहाच्या सुरक्षारक्षकांना बोलवण्यात आलं. त्यानंतरही खासदार एकमेकांना शिव्या देत, फाइल्स एकमेकांच्या अंगावर फेकत होते. अनेक पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर याचं लाईव्ह टेलिकास्ट झालं.

“یہ ہم ہیں،
یہ ہماری پارلیمنٹ ہے
اور یہ قانون سازی ہو رہی ہے!” pic.twitter.com/viXwApvW0g

— Mansoor Ali Khan (@_Mansoor_Ali) June 15, 2021

पीएमएल-एनच्या खासदार मरियम औरंगजेब यांनी इम्रान खान यांच्यावर पंतप्रधानांनी संसदीय व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला. इम्रान खान यांचा हाच नवा पाकिस्तान आहे जिथे फॅसिस्ट शक्तींचं वर्चवस्व आहे. इम्रान यांच्यामध्येही फॅसिस्ट मानसिकता दिसून येते. इम्रान यांनी देशाच्या संसदेला लाचार बनवलं आहे. त्यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीची कंबर मोडलीय. हीच इम्रान यांची रियासत-ए-मदीना आहे, अशा शब्दांमध्ये मरियम यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

युरो कप – ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम, पोर्तुगालचा विजय https://t.co/fLW6zLKUrW

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध
Next Article मुंबई : भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, हाणामारी, पहा व्हिडिओ

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?