Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

admin
Last updated: 2025/06/07 at 6:05 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

नागपूर, 7 जून (हिं.स.) – जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते की, स्वतःशी खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा राहुल गांधी अपमान करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे. रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. भाजपने महाराष्ट्र विधानसभा मॅच फिक्सिंग करून जिंकली. तसेच भाजपने लोकशाही कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले, असे आरोप एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केला. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे. तर, पण राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाही. स्वतःशीच खोट बोलणे सोडणार नाही, खोटे आश्वासनाने दिलासा देण्याचे सोडणार नाही, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही, त्यांना जागे व्हावे लागेल, वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल.

अशा पद्धतीने खोटं ते नेहमी बोलत असतात मतदारांचा अपमान करत असतात. राहुल गांधीने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते ऐकणाऱ्या समजत नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. यापैकी एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या, जी त्यांची महाराष्ट्र विधानसभेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला फक्त ५० जागेवर विजय मिळवता आला. हा निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता.

राहुल गांधी यांनी म्हटले की, ही किरकोळ फसवणूक नाही तर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी आहे. २०२३ मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत बदल केले, ज्यामध्ये आता मुख्य न्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहणे कठीण झाले.

राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये एनडीए सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोगाच्या निवड पथकात फेरफार करण्यात आला, मतदार यादीत बनावट नावे जोडण्यात आली, मतदानाचे आकडे जाणूनबुजून वाढवून सांगण्यात आले, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बनावट मते तयार करण्यात आली आणि पुरावे लपवण्यात आले, अशा पद्धतीने एनडीएने निवडणूक जिंकली, असेही म्हटले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी ३ फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली होती. देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असे मी म्हणत नाही; परंतु जे घडले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी छोट्या-मोठ्या गोंधळाबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल बोलत आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत; परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरीही केवळ अधिकृत अशा आकडेवारीवरूनही सगळा खेळ समोर येतो. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात : निवडणूक आयोग आणि भाजप!, असे गांधी यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Next Article शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?