Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

admin
Last updated: 2025/06/12 at 6:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नागपूर, 12 जून (हिं.स.) : राहुल गांधी यांना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधानांना कुणीही पत्र पाठवू शकतो. परंतु, त्याबद्दल बोलणे आवश्यक वाटत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात गुरुवारी भाजप सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली, यावेळी गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारच्या कामगिरीबद्दल सांगितले. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपले मत मांडले.

राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधानांना पत्र लिहून वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी दलित, एसटी, ईबीसी, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीला होणारा विलंब दूर करण्याचे आवाहन राहुल यांनी केलेय.

राहुल यांच्या पत्राबद्दल गडकरींना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचाच पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. मला याबद्दल काहीही बोलण्याची गरज नाही. लोकशाहीत कोणीही पंतप्रधानांना पत्र लिहू शकते. पण, राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करणे योग्य वाटत नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचे कौतुक केले. गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए सरकारची 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा कार्यकाळ बदललेल्या देशात बदललेल्या सरकारचे नाही तर बदललेल्या युगाचे प्रतीक आहे. या कार्यकाळात, आपल्या देशाच्या समृद्धी, सुरक्षा, सामाजिक सौहार्द आणि सांस्कृतिक अभिमानाच्या चारही आयामांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व क्रांतिकारी बदल घडले आहेत असे गडकरींनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण
Next Article शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?