सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)
पंढरपूर ग्रामीण पोलिसच्या परिविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांनी सांगोल्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांवर कारवाई करत चार लाख ८० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सांगोल्यातील अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.पंढरपूर ग्रामीण पोलिसाच्या परिविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा यांना गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला येथील शिवाजी चौकातील एका गाळ्यात बेकायदेशीर ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली.
.पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता फिरोज सिकंदर मुल्ला हा ‘प्ले विन’ नावाच्या ऑनलाइन रुलेट जुगाराचा अड्डा चालवत होता. तो लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारत होता.पोलिसांनी अक्षय विजय इंगोले (वय २५, अनिल भारत जाधव (वय ३६), राजन उदयसिंह देशमुख (वय २०), सोहेल तायर खतीब (वय २४), आस्लम जाफर मुलाणी (वय २१), जैश रियाज मुजावर (वय २१), विशाल शिवाजी गायकवाड (वय ३२), मोहसीन ईलाही खतीब (वय ३७, सर्व रा. सांगोला) यांच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण चार लाख ८० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.