सोलापूर प्रतिनिधी: राजश्री सिमेंटची छोटी डायरी ज्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या पानावर दिनांक विरहित व्याज, मुद्दल व रक्कम अशा ७ नोंदी नमूद आहेत. ५० चे दोन स्टॅम्पवरील करारनामेही सापडले आहेत. राणी मोहन जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : हगलूर (ता. उत्तर सोलापूर) येथील राणी मोहन जाधव यांच्या घरी सहकार विभागाने टाकलेल्या धाडीत अवैध सावकारीशी निगडित करार, बॉण्ड व हिशेबाच्या डायऱ्या आढळून आल्या आहेत. उत्तर सोलापूर सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक प्रिया राजेंद्र संकद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राणी जाधव यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ त्याखालील नियम २०१४ प्रमाणे अवैध सावकारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ दशरथ शिंदे (रा. हगलूर, ता. उत्तर सोलापूर) यांच्या अर्जावरून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व उत्तर सोलापूरचे सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आज सकाळी ७.३० वाजता पथक प्रमुख पी. आर. संकद, ए. एस. पुजारी, व्ही. जे. गौड, एस. बी. कासार, पंच क्र. १ रामदास मादगुंडी, एन. एन. बल्ला, पोलिस हेड कॉन्स्टेबल रहीम इलाही सय्यद, महिला पोलिस कॉन्स्टेबल कविता वंजारी या पथकाने जाधव यांच्या घराची झाडाझडती घेतली.
यात जाधव यांच्या घरातील लोखंडी कपाटात एका छोट्या डायरीत स्टॉकिस्ट प्रगती एजन्सीज ६६६, फलटण गल्ली, सोलापूर यामध्ये सुरुवातीच्या दोन पानांवर रक्कम व दिनांक व्याज, महिने असे नमूद आहे. राजश्री सिमेंटची छोटी डायरी ज्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या पानावर दिनांक विरहित व्याज, मुद्दल व रक्कम अशा ७ नोंदी नमूद आहेत. ५० चे दोन स्टॅम्पवरील करारनामेही सापडले आहेत. राणी मोहन जाधव (रा. हगलूर, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.