मुंबई, ५ ऑगस्ट – राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा जोर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ ते ८ ऑगस्टदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम आणि काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाची शक्यता आहे.
हवामान बदलाची कारणे
अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशेचा कमी दाबाचा पट्टा आणि तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेले चक्राकार वारे यामुळे राज्यात हवामानात बदल जाणवत आहे.
मुंबईत मात्र उसंत
मुंबई आणि उपनगरांत गेल्या २४ तासांपासून पावसाची विश्रांती असून अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र, इतर भागांतील पावसामुळे राज्यातील तापमानात काहीसा दिलासा मिळणार आहे.
यलो अलर्ट लागू असलेले जिल्हे:
५ ऑगस्ट:
-
विदर्भ: नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
-
मराठवाडा: नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी
-
दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सांगली
६ ऑगस्ट:
-
विदर्भ: वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
-
मराठवाडा: बीड, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव
-
दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
७ ऑगस्ट:
-
कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
-
मराठवाडा व विदर्भ: नगर (अहिल्यानगर), सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
८ ऑगस्ट:
-
कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर
-
मराठवाडा व विदर्भ: सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
राज्यातील उकाड्याने त्रस्त नागरिकांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरणार आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.