Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के पाऊस, पाच तालुक्यात सरासरी ओलांडली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के पाऊस, पाच तालुक्यात सरासरी ओलांडली

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 9:36 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस तालुक्यांत सरासरीच्या ८५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के इतका पाऊस झाला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

रात्रीच्या बारा वाजेपासून पाऊस सुरूवात होऊन अधूनमधून मुसळधार पाऊसाने सकाळी सहा वाजेपर्यंत झोडपून काढले. परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. पावसामुळे सोयाबीन, उडीद पिकास फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणाचे काढणीस आलेले सोयाबीन पाण्यात गेले आहेत. शेतास तळ्याचे स्वरूप आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. काल शनिवारी, २५ सप्टेंबरपर्यंत ४८०.६ मि.मी. म्हणजे ९९.९ टक्के इतका पाऊस पडला आहे.

मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५२७ मि.मी. इतका ११५.३ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६१० मि.मी. ११०.५ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि.मी. अपेक्षित असताना ५८३ मि.मी. ११०.४ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि.मी. अपेक्षित असताना ५५६ मि. मी. म्हणजे १०३.७ टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४३९ मि. मी. म्हणजे १०१ टक्के इतका पाऊस पडला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अक्कलकोट तालुक्यात ९७.९ टक्के, सांगोला तालुक्यात ९६.६ टक्के, पंढरपूर तालुक्यात ९३.७ टक्के, तर माढा तालुक्यात ९३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. माळशिरस व करमाळा तालुक्यांत मात्र आतापर्यंत ८५ टक्के इतकाच पाऊस पडला आहे.

दोन बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव तर १५ लघु होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, शेळगाव, चारे, कळंबवाडी, जवळगाव हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, पाथरी, कारी, तावडी, वैराग व घोळसगाव या तलावात ६४ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. रामपूर २५ टक्के, तर बीबीदारफळ तलावात ३२ टक्के पाणी साठा झाला आहे.

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख मध्यम प्रकल्पात ६७.३५ टक्के (१.४५ टी.एम.सी.) पाणी आले आहे. हिंगणी ७५.४५ टक्के, जवळगाव ७७.४६ टक्के, मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के तर बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

* काही काळासाठी संपर्क तुटला होता

बार्शीतील उक्कडगाव येथील नागोबा नदीला पूर आल्याने पांगरीकडे येणा-याचा संपर्क तुटला होता. दुपारपर्यंत ही पूराचे पाणी कमी न झाल्याने लोकांना पांगरीकडे ये-जा करता आली नाही. येरमाळाकडे जाण्यासाठी मोती खाण नदीला मोठ्याप्रमाणात पूराचे पाणी आल्याने त्या बाजूचा ही संपर्क तुटला होता. पांढरी येथील पाझर तलावाचे साठवण तलाव रूपांतर झाल्याने उंची वाढविण्याचे काम चालू आहे. त्यामुळे तलावात सध्या पाणी साठून राहत नाही. या तलावात वडगाव, चोराखळी परिसरातून मोठ्याप्रमाणात पाणी येत असल्याने नदी मोठ्याप्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे काही काळ पुरामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता.

घोळवेवाडी येथील नीलकंठा नदी पूर आल्याने संपर्क तुटला होता. चिंचोली येथील नीलकंठा नदीवरील सर्व बंधारावरून पाणी वाहिले आहे. दोन वर्षापूर्वी पाणी फौंडेशनच्या कामात निर्माण केलेल्या खड्ड्यात, चरीमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे पुढील काळातील पाणीटंचाई संकट काही अंश तरी कमी होण्यास मदत होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #total #rainfall #Solapur #district #99.9percent #surpassing #Average, #सोलापूर #जिल्ह्यात #९९.९टक्के #पाऊस #सरासरी #ओलांडली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस निरीक्षकाने केले गरीब मुलीचे कन्यादान, पोलीस स्टेशनमध्येच पार पाडला लग्नसोहळा
Next Article सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?