Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रैना म्हणतो ब्राह्मण तर जाडेजा म्हणतो राजपूत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

रैना म्हणतो ब्राह्मण तर जाडेजा म्हणतो राजपूत

Surajya Digital
Last updated: 2021/07/24 at 11:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली :  क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या ‘मी ब्राह्मण आहे’… यासंदर्भातील वाक्यावरून वाद झाल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने ‘नेहमीसाठी राजपूत, जयहिंद’ ! असे ट्विट केले आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी दोघांवरही टीका केली आहे. जात, धर्म आणि रंग, याला अर्थ नाही, अशा कमेंट्स क्रिकेट चाहत्यांनी केल्या आहेत. ‘एवढ्या प्रतिष्ठीत पातळीवर जातीचे प्रदर्शन.. लाजिरवाणे’, अशा शब्दातही टीका करण्यात आली आहे.

जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. 4 ऑगस्टपासून भारताला इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सराव सामना अनिर्णित राहिला. परंतु रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजी शानदार प्रदर्शन केले. जडेजाने दोन्ही डावात अनुक्रमे 75 आणि 51 धावा केल्या.

तर सुरेश रैनाने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता धोनी आणि रैना आपल्याला आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर खेळताना दिसतात. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले गेले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* सुरेश रैनाची आणी जडेजाची चूक

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमियर लीग दरम्यान समालोचन करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. समालोचन करताना म्हणाला होता की, तो एक ब्राह्मण आहे आणि यामुळेच त्याला चेन्नईची संस्कृती आत्मसात करण्यासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत.

यावरूनच सोशल मीडियावर रैनावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर आता यामध्ये रैनानंतर चेन्नई सुपर किंग्स संघातील त्याचा साथीदार रवींद्र जडेजाचेही नाव यात ओढावले गेले आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाची सोशल मीडियावर फजिती झाली. टीकेला सामोरे जावे लागले.

जडेजाने नुकतेच हे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सदैव राजपूत मुलगा (राजपूत बॉय), जय हिंद.’ जडेजाने केलेले हे ट्विट चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. जडेजाच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, ‘जडेजाकडून अशा ट्विटची अपेक्षा नव्हती. अशा पद्धतीने खेळामध्ये जातीवाद निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.’

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #Raina #Says #Brahmin #while #Jadeja #Rajput, #रैना #म्हणतो #ब्राह्मण #जाडेजा #राजपूत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उमरगा बसस्थानकात आढळले २ बेवारस मुली, संपर्क साधण्याचे आवाहन
Next Article कुरुल- पंढरपूर रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यासाठी रक्तदान आंदोलन; ७७ जणांचे रक्तदान

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?