Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात पावसाचा जोर वाढला; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पुण्यात पावसाचा जोर वाढला; खडकवासला धरणातून विसर्ग सुरू

admin
Last updated: 2025/06/20 at 4:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 20 जून (हिं.स.)।

खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत चारही धरणांत मिळून १.७१ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, पहाटेपासून जोरदार सरी बरसल्या. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचण्याचे तसेच काही ठिकाणी झाडपडीचे प्रकार घडले आहेत. शिवाय सकाळी कार्यालयांमध्ये निघालेल्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरात दिवसभरात सर्वाधिक पाऊस हा एनडीए परिसरात झाला असून, ३३.५ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर असल्यामुळे काही भागांतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. मागील चोवीस तासांत लवळे परिसरात ६४ मिलिमीटर, चिंचवडमध्ये ६०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मागील नऊ तासांत एनडीए, मगरपट्टा, शिवाजीनगर भागात पावसाचा जोर वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत- पाकिस्तान युद्धबंदीसाठी पाकिस्तानने घेतली सौदीची मदत
Next Article उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच – बावनकुळे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?