Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजस्थान मंत्रीमंडळ विस्तार; १५ मंत्र्यांनी घेतली शपथ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

राजस्थान मंत्रीमंडळ विस्तार; १५ मंत्र्यांनी घेतली शपथ

Surajya Digital
Last updated: 2021/11/21 at 8:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारच्या सर्व मंत्र्यांनी काल राजीनामे दिले होते. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीनंतर हे राजीनामे घेण्यात आले होते. त्यानंतर सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आता काही फेरबदल करुन नवीन लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

आज एकूण १५ मंत्र्यांनी जयपूरमधील राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १२ नवे चेहरे आहेत. राजस्थानमध्ये आज, रविवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काल, शनिवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचनेसाठी सर्व मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला होता. याता सचिन पायलट यांच्या पाच जवळच्या मंत्र्यांचे नव्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे. आज ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सचिन पायलट यांच्या गटातील हेमाराम चौधरी यांनी सर्वप्रथम मंत्री पदाची शपथ घेतली.

राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल कलराज मिश्र यांनी या आमदारांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यपालांनी हेमाराम चौधरी, महेंद्रजीत मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा, ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जूली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत यांच्याकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. तर जाहिदा खान, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीणा यांच्याकडून राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. जाहिदा खान यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

या नव्या मंत्रिमंडळ विस्तारातून मंत्री रघु शर्मा, हरीश चौधरी आणि राज्यमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या हटवण्यात आले आहे. या तिन्ही मंत्र्यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत राजीनामा पत्र यापूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले होते. राजस्थान काँग्रेसचे डोटासरा अध्यक्ष आहेत. तर डॉ. रघु शर्मा यांना काँग्रेसने गुजरात आणि हरीश चौधरी यांना पंजाब प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.

(Rajasthan cabinet expansion; 15 ministers take oath)

पुढील महिन्यात गहलोत सरकार ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. हा मंत्रिमंडळातील पहिलाच फेरबदल आहे. या फेरबदलाकडे पक्षातील गटबाजी दूर करण्याबरोबरच प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्यासाठीची कसरत म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड करताना पायलट यांच्यासह हटवण्यात आलेल्या विश्वेंद्र सिंह आणि रमेश वीणा यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. तर बीएसपीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांपैकी राजेंद्र गुढा यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Rajasthan #cabinet #expansion #15ministers #oath, #राजस्थान #मंत्रीमंडळ #विस्तार #शपथ #फेरबदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी संप चिघळण्याची चिन्हे; धुळ्यात चार एसटीबसवर दगडफेक
Next Article अमरावती दंगल- ‘ठाकरे सरकार केवळ हिंदुंवर कारवाई करत आहे’

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?