Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘राजगृह’ तोडफोडप्रकरणी अखेर मुख्य आरोपीला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रगुन्हेगारी

‘राजगृह’ तोडफोडप्रकरणी अखेर मुख्य आरोपीला अटक

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 11:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २० रा. कल्याण) असे या आरोपीचे आहे. याआधी त्याचा साथीदार उमेश सीताराम जाधव (वय ३०) याला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव हा दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्टपणे दिसत होते. त्या आधारे शोध घेऊन उमेश याला अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आता मुख्य आरोपी कचाट्यात सापडल्याने या हल्ल्यामागचे कारण उघड होणार आहे.

दरम्यान, ८ जुलै रोजी हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. या घटनेची गंभीर दखल घेत राजगृहजवळ लगेचच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजगृहवरील हल्ल्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यातूनच ‘राजगृह’ वास्तूला यापुढे २४ तास पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘राजगृह’च्या सुरक्षेचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षेबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #राजगृह #तोडफोड #माटुंगापोलिस #डॉबाबासाहेबआंबेडकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्लीत खासदारकीची शपथ घेत असताना पवारांविरोधात नाशिकमध्ये घोषणाबाजी
Next Article परीक्षा देणारे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; ६०० पालकांविरोधात गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?