चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा ‘रामराम’ केला आहे. त्यांनी रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असं रजनीकांत यांनी स्पष्टपणे सांगितले. यापुढे ‘रजनी रसीगर नरपानी’ या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. यामुळे रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशांच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
https://twitter.com/ANI/status/1414464372638830598?s=19
दाक्षिणात्य तसेच बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना महामारी देशात थैमान घातलं. तसेच रजनीकांत यांची प्रकृतीही मध्यंतरी ठिक नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या सल्लागारांना एक पत्र लिहून कोरोना आणि त्यांच्या प्रकृतीमुळे ते राजकारणात प्रवेश करु इच्छित नसल्याचे सांगितलं होत.
यावरच आता सुपरस्टार रजनीकांत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजकारणापासून कायमचा दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1414471861803442181?s=19
सोबतच ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414519269644148738?s=19
याविषयी माहिती देताना रजनीकांत म्हणाले की, ‘रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय घेतला असून फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल.’ असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.
* रजनीकांतने घेतला यू टर्न
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रजनीकांतने सांगितलं होतं की, जानेवारी 2021 मध्ये नवीन पक्षाची स्थापना करणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी रजनीकांत पक्ष काढणार असल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रजनीकांतने यू टर्न घेतला आणि आपण राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं होतं.
https://twitter.com/rajinikanth/status/1414461069838323719?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1414461069838323719%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
त्यानंतर रजनीकांतच्या अनेक समर्थकांनी पुन्हा इतर पक्षांमध्ये प्रवेश केला होता. रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कायमच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला होता. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली आहे.
पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष ; आजपासून शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी, मुख्यमंत्री तरी लोक भावना जाणून घेतील का ? https://t.co/47NIX7HJyl
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021