हिंगोली / मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत इतरही मोठ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. राजीव सातव यांचं काल रविवारी निधन झालं. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
Extremely saddened….
Rest in Peace #RajivSatav ji.🙏🙏 https://t.co/QCyvwSpXui
— Abhayjit singh(अभयजीत सिंह) (@abhayjitsandhu) May 17, 2021
आज सकाळपासूनच कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर गर्दी करीत होते. रात्री 9 वाजेच्या दरम्यान त्यांचे शव कळमनुरी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहते व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. राजीव सातव यांच्या निवासस्थानी त्यांचे शव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे ,राजीव सातव जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी राजीव सातव यांच्या मुलीने अशा दुःखातही सावरत कोसळून गेलेल्या आईला धीर दिला. यावेळी अनेकांची डोळे पानावले.
https://twitter.com/kute9nath/status/1394205524422397953?s=19
अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. त्यांचे शव कळमनूरी शहरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या शव वाहिनीवर पुष्पवृष्टी केली. 17 मे रोजी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या निवासस्थानासमोरच्या मोकळ्या जागेत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजीव सातव जी को आखिरी सलाम, अल्लाह इनकी रूह को जन्नत में जगह अता फ़रमाये.. आमीन
अब ये चेहरा कभी नही देख पाएंगे ।।
😥😥😥😥
#RajivSatav pic.twitter.com/agcbUNeAWt
— Sahil 🇮🇳 (@Sahil_hindustan) May 17, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चारवेळा संसदरत्न पुरस्कार सन्मानित खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येऊनही मृत्यू, झुंज अपयशी https://t.co/dNFQpyf1GQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
याठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार मयूर खेंगले आदींची उपस्थिती होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सातव यांचे घर ते मुख्य रस्त्यापर्यंत त्यांच्या चाहत्यांना-येण्यासाठी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवण्यात आले होते.
'राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला' https://t.co/Mad0yTWUab
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार जीशान सिद्दिकी आदींची उपस्थिती होती. गर्दी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, सपोनि श्रीनिवास रोयलावार, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, सिद्दिकी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नोकरीची संधी; महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती, 26 मे पर्यंत करा अर्ज https://t.co/ClQqaEaI5H
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने सर्वच स्तरातून दु:खं व्यक्त होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून अनेक काँग्रेस नेते आणि राज्यातील नेत्यांनी राजीव सातव यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सावत यांचे काल रविवारी पहाटे निधन झाले.
कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021