मुंबई, 19 ऑगस्ट – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना लंडनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध उद्योगपती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुपचे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रामदास आठवले यांनी दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या सामाजिक व आर्थिक न्यायासाठी दिलेल्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. मागील पाच दशकांपासून सामाजिक न्यायाच्या चळवळीतील कर्णधार म्हणून त्यांचे कार्य जगभरातील समतावादी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
दैनिक लोकमत तर्फे लंडनमधील सवय हॉटेलमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेन्शन चेही आयोजन करण्यात आले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर रामदास आठवले यांनी लोकमत समूहाचे आभार मानले.