Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रामदेवबाबांनी पुन्हा उधळली स्तुती सुमने; पुढची १०- २० वर्षे नरेंद्र मोदींना नाही पर्याय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

रामदेवबाबांनी पुन्हा उधळली स्तुती सुमने; पुढची १०- २० वर्षे नरेंद्र मोदींना नाही पर्याय

Surajya Digital
Last updated: 2020/11/15 at 9:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : रामदेव बाबांकडून अनेकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमने उधळली जातात. असेच पुन्हा एकदा एका मुलाखतीमध्ये योगगुरु रामदेव बाबांनी पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही असं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे पुढची १० ते २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की देशात मोदी फॅक्टर आहे का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, “कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे. ” असंही बाबा रामदेव म्हणाले. इतकंच नाही तर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही.

तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे. असं उत्तर बाबा रामदेव यांनी दिलं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #रामदेवबाबांनी #पुन्हाउधळली #स्तुतीसुमने #पुढची१०-२०वर्षे #नरेंद्रमोदींना #नाहीपर्याय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार नवनीत, आमदार रवी राणा दांम्पत्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
Next Article बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच होणार विराजमान, उद्या घेणार शपथ

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?