अयोध्या – राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची देखभाल कऱणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्र्स्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या हजारो फूट खाली एक टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
राम मंदिराची उभारणी जिथं होणार आहे तिथं 2 हजार फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात येईल.
राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी देशातील अनेक नद्यांचे पाणी आणि तिर्थस्थानांवरून माती आणली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले होते त्या नद्या, स्थाने याठिकाणांचा समावेश आहे. या पवित्र पाण्याने भूमीपूजनावेळी अभिषेक करण्यात येईल, असंही चौपल यांनी सांगितलं.
* यासाठी ठेवणार ‘टाईम कॅप्सूल’
भविष्यात कोणी राम मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करणार असेल तर त्याला राम जन्मभूमीशी संबंधित खरी माहिती मिळेल. तसंच नविन कोणता वाद होणार नाही. हे कॅप्सूल एका ताम्रपत्रात ठेवण्यात येणार आहे.
ज्यामुळे भविष्यात मंदिराशी संबंधित काही वाद विवाद होऊ नये. या कॅप्सूलमध्ये मंदिराचा इतिहास आणि इतर माहिती असणार आहे. कामेश्वर चौपाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. कामेश्वर चौपाल म्हणाले की, मंदिराबाबत झालेला संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील लढ्याने सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक धडा दिला आहे.