Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; उद्धव ठाकरेंविरोधात राणा दाम्पत्याची तक्रार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; उद्धव ठाकरेंविरोधात राणा दाम्पत्याची तक्रार

Surajya Digital
Last updated: 2022/04/24 at 2:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामीनावर वांद्रे कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राणा दाम्पत्यावर 124 A कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. राणा दाम्पत्याच्या जामिनासंदर्भात 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत.

बॉम्बे पोलीस ॲक्ट सेक्शन ३५ अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत एखादी व्यक्ती अडथळा आणत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. राणा यांनी पोलीस चर्चेसाठी गेलेले असताना वॉरंटची मागणी केली. पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यानुसार ही कारवाई केल्याचं स्पष्ट झालंय. कालपासून या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोमय्यांनी वांद्रे पोलिसात दिलेला गुन्हा देखीलञ आला खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय .

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे.अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. आज तातडीने सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता. त्यासाठी १२.३० नंतर सुनावणी पार पडली. त्यात राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. ॲड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Rana couple remanded in judicial custody for 14 days; Rana couple’s complaint against Uddhav Thackeray

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राणा दाम्पत्यावर आयपीसी १५३ ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारं वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करते, त्यावेळी हे कलम लावण्यात आलं आहे. यासोबत आयपीसी ३४ आणि ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलमांनुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो, याची जाणीव असतानाही कृत्य केल्यास ही कलमं दाखल होतात.
येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

□ उद्धव ठाकरेंविरोधात राणा दाम्पत्याची तक्रार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत यांच्यासह 700 शिवसैनिकांविरोधात मुंबईतल्या खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे 700 कार्यकर्ते आपल्या घरासमोर हल्ला करण्यासाठी आले होते, असा आरोप राणांनी केला आहे.

दरम्यान, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे जबाबदार राहतील, अशी तक्रार खार पोलीसांत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Rana #couple #remanded #judicial #custody #14days #complain #UddhavThackeray, #राणा #दाम्पत्य #14दिवसांची #न्यायालयीन #कोठडी #उद्धवठाकरे #तक्रार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी : केस माघारी घे म्हणून दोघांना मारहाण, सातजणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Next Article पैशाच्या कारणावरून सोलापुरात खून, महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?