Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छञपती शिवाजी महाराजांसह औरंगजेबाची भूमिका करणा-या रंगकर्मी अविनाश देशमुखांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

छञपती शिवाजी महाराजांसह औरंगजेबाची भूमिका करणा-या रंगकर्मी अविनाश देशमुखांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/07/25 at 5:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रूरकर्मा औरंगजेब या दोन्ही परस्परविरोधी पात्रांची भूमिका साकारणारे देशमुख हे एकमेव कलाकार असावेत.

हौशी नाटकांतून काम करण्यासाठी त्यांनी पत्नी स्वाती देशमुख यांसह ‘सीमांत’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ऐतिहासिक नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी देशभरात सादर केले.

याशिवाय त्यांनी ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘ही श्रींची इच्छा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ आदी नाटकांची निर्मिती करत त्यामध्ये देशमुख यांनी भूमिका साकारली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे ते माजी उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी स्वाती, मुलगी ऋजुता, मुलगा चैतन्य, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

*  रंगकर्मी देशमुखांचा जीवनपट

आयुष्यभर रंगभूमीची सेवा करणारा कलावंत म्हणून अविनाश देशमुख यांची ओळख होती. ‘सीमांत’ या नाट्यनिर्मिती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले.”रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित नाटकांचे प्रयोग देशभरात सादर करून अविनाश देशमुख यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांनी ‘ही श्रींची इच्छा’, ‘कुर्यात सदा टिंगलम्’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘जोडी गुलाबी’, ‘कुलकर्ण्याचं स्थळ’ या नाटकांची निर्मिती करून, त्यात भूमिकाही साकारल्या.

केवळ स्वतःच नाही, तर देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या नाटकांत भूमिका साकारत होते. महाराष्ट्रात, देशभरात आणि परदेशातही ‘रायगडाला जेव्हा जाग येते’चे प्रयोग करून देशमुख यांनी रसिकांची ऐतिहासिक नाटकांची ओढ टिकवून ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रूरकर्मा औरंगजेब या दोन्ही परस्परविरोधी पात्रांची भूमिका साकारणारे देशमुख हे एकमेव कलाकार असावेत. सुमारे ४८ वर्षांहून अधिक काळ देशमुख रंगभूमीवर कार्यरत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी ठाण्यात शेवटचा प्रयोग केला. देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #अविनाशदेशमुख #रंगकर्मी #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात आज चार मृत्यू तर नव्याने 96 कोरोना बाधित; रुग्णालयात उपचाराअभावी एकाचा मृत्यू
Next Article बत्तीस शिराळ्यात यंदा ‘बँजो’ वाजला ना ‘मिरवणुका’ निघाल्या; फक्त पूजा आणि पालखी उत्सव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?