Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सात दशकापासून रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सात दशकापासून रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/11/30 at 10:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचं आज सकाळी साडे दहाच्या सुमारास वृद्धापकाळानं झाले. त्यांनी नवी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

2011 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मृत्यूसमयी त्यांचं वय 86 वर्ष होतंय. नाट्य आणि कलावर्तुळात राम जाधव ‘मामा’ नावाने प्रसिद्ध होते. मामांचं हौशी रंगभूमीसाठी मोठं योगदान आहे. मामांनी अकोल्यात 60 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘रसिकाश्रय’ संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावत आणि नाटकं रंगभूमीला दिलीत. ‘रसिकाश्रय’ ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नाट्य संस्थांपैकी एक आहे.

* राम जाधवांची कारकीर्द

राम जाधव गेल्या सात दशकांपासून रंगभूमीशी जुळल्या गेलेत. अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्यात. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांच्या विविध भूमिका वठविणं सुरूच होतं. राम जाधव म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील हौशी रंगभूमीवरचं एक भारदस्त नाव. थोडे थोडके नव्हे तब्बल 50 वर्षे हे नाव राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सातत्याने गाजत राहिलं. त्यातून रंगभूमीवर अकोल्याचा झेंडा डौलाने फडकत गेला. नाट्यस्पर्धेत मुंबई , पुणे व नागपूर सारख्या सर्वार्थाने पोषक वातावरण असलेल्या शहरांतील रंगकर्मीशी त्यांनी मोठा संघर्ष केला. अन अकोल्यासह विदर्भातील कलावंतांना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. प्रतिकूल परिस्थितीत आणि तुटपुंज्या साधन-सामुग्रीच्या बळावर एकनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ साथीदारांच्या सहकार्याने मत्तब्बर नाट्य संस्थाना जेरीस आणणारा लढवय्या म्हणजे ‘मामा’ जाधव. राम जाधव म्हणजे नाट्यशास्त्राचं चालतं बोलतं विद्यापीठच होतं. ‘रसिकाश्रय’ नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अकोल्यातील अनेक नाटकं रंगभूमीवर अजरामर केलीत. मामांनी अभिनयासोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. मामांनी नाट्यनिर्माते सातत्याने 150 वर नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली होती.

* अनेक पुरस्काराने सन्मान

राम जाधव यांना त्यांच्या रंगभूमीवरील योगदानामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. मात्र, त्यांचा नाट्यसेवेचा सर्वात मोठा सन्मान केला गेला. 2011 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड झाली होती. हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. यासोबतच राज्य रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अनेक वर्ष ते सदस्य होतेय. अगदी पाच वर्षांपूर्वी ते राज्य नाट्य परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. करण जोहरचा वादात सापडलेला ‘ए.आय.बी’ या शोच्यावेळी नाट्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या वादावेळी त्यांची परखड भूमिका अतिशय चर्चेचा विषय ठरली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सातदशकापासून #रंगभूमी #गाजवणारे #ज्येष्ठनाट्यकर्मी #रामजाधव #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तीन – चार महिन्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार – केंद्रीय आरोग्यमंत्री
Next Article शिक्षक – पदवीधरसाठी आज मतदान, पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?