छत्रपती संभाजीनगर, 8 ऑगस्ट – भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कन्नड शहर व तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या संजना जाधव या शिवसेनेच्या आमदार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याच अंतर्गत रावसाहेब दानवे यांनी आज कन्नड शहर आणि तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. हा कार्यक्रम पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे.