Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; तर पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; तर पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार

Surajya Digital
Last updated: 2022/05/11 at 5:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जोडभावी पेठच्या पोलिसांनी सोमनाथ राम गुंडाराम (वय २३ रा. मड्डीवस्ती, जुना तुळजापूर नाका ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. Rape of a woman on the pretext of marriage; Atrocities on the abducted girl

ती २७ वर्षीय महिला कर्नाटक येथे राहण्यास असून सोलापुरात माहेरी येत होती. सोमनाथ गुंडाराम याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. आणि २०१९ पासून ते आजतागायत तिच्यावर रुपाभवानी मंदिर बागेजवळ आणि संजीवनी हॉटेल (दहिटणे रोड) या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. अशा आशयाची फिर्याद त्या महिलेने नुकतीच जोडभावीपेठ पोलिसात दाखल केली. पुढील तपास महिला फौजदार व्हट्टे या करीत आहेत.

□ पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न; दोघांना ५ दिवसाची कोठडी

सोलापूर – एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर बाजारच्या पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी (ता.10) दिला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

सोहेल रियाज शेख (वय २२ रा. शास्त्रीनगर,भाजी मार्केट जवळ) आणि ऋषिकेश मेघराज हजारे (वय २० रा.न्यूपाच्छा पेठ, पाथरूड चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना १४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण २७ एप्रिल रोजी  करण्यात आले होते.

यासंदर्भात मुलीच्या पालकांनी सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी दोन्ही आरोपींना नुकतीच अटक केली. पिडीत मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमात वाढ करून सोमवारी अटक करून पोलीस कोठडी घेतली. पूढीलतपास सहाय्यक पोलिस आयुक्त करीत आहेत.

■ मंद्रूप येथे सत्तूरने मारहाण महिलेसह तिघे जखमी

– मंद्रूप (ता.दक्षिण सोलापूर) येथे डुक्कर सोडल्याच्या कारणावरून काठी आणि सत्तूरने केलेल्या मारहाणीत रामा वजीर मरीआईवाले (वय ३५) त्याची पत्नी काशीबाई आणि लक्ष्मण वजीर मरीआईवाले (वय ४०) असे तिघेजण जखमी झाले. ही घटना  मंगळवारी (ता. 10) सकाळच्या सुमारास घडली.त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवानंद मरीआईवाले, राजू मरिआईवाले यांच्यासह चार ते पाच जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Rape #woman #solapur #crime #pretext #marriage #Atrocities #abducted #girl, #लग्न #आमिष #महिला #बलात्कार #पळवून #मुलीवर #अत्याचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : दुरुस्तीचे काम करताना दोन वीज कर्मचारी जखमी, एक गंभीर
Next Article वैरागमध्ये रेल्वेतून डिझेल चोरीचा गुन्हा, टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?