Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नेत्यांच्या मेळाव्यानिमित्त सामान्यांची होरपळ; दोन्ही मेळाव्यात ‘एक खुर्ची’ रिकामी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नेत्यांच्या मेळाव्यानिमित्त सामान्यांची होरपळ; दोन्ही मेळाव्यात ‘एक खुर्ची’ रिकामी

Surajya Digital
Last updated: 2022/10/05 at 5:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : मुंबईतील राजकीय दसरा मेळाव्यांसाठी महामंडळाच्या अनेक बस राजकीय नेत्यांनी बुक केल्या आहेत. पण, त्यामुळे सामान्य जनतेला ताण सहन करावा लागत आहे. दसऱ्याच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांना बस नसल्याने खोळंबून राहावे लागत आहे. नेत्यांच्या मेळाव्यानिमित्त सामान्यांची होरपळ होतीय. याबाबत तक्रार आणि कैफियत कुठे मांडायची हा सवाल उपस्थित होत आहे. Common people’s uproar on the occasion of leaders’ meeting; Sanjay Raut Babasaheb Thackeray has one seat empty in both the gatherings

 

बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहतूक प्रचंड महागली आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने १८०० एसटी गाड्या व तीन हजार खासगी गाड्या बुक केल्या आहेत. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरल्याचे समजते. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी दोन्ही गटांकडून सुमारे चार हजार बस आणि १० हजार छोटी वाहने मुंबईत येण्याचा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी सायंकाळी होणाऱ्या या मेळाव्यांसाठी दोन्ही गटांकडून लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणले जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ नये, यासाठी दोन हजारांहून अधिक पोलीस मुंबईतील रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दरम्यान, आज बीकेसी मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार, अशी माहिती समोर आली आहे. या रिकाम्या खुर्चीवर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री चाफ्याची फुले वाहतील आणि नमस्कार करतील. ही खुर्ची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात येणार असून हेच आमचे बाळासाहेबांना अभिवादन असेल असे शिंदेनी सांगितले आहे.

 

एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं आसन लावण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये तुरुंगात असलेले संजय राऊत यांची खूर्ची लावण्यात आलेली आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आपापल्या मेळाव्याला गर्दी खेचण्यासाठी उभयतांकडून प्रयत्न झाले. मात्र प्रत्यक्षात कुठे किती गर्दी होते, हे संध्याकाळी स्पष्ट होईल.

 

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र त्यांची आठवण ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून त्या मेळाव्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर येतील तेव्हा एका चाफ्याच्या फुलांचा हार या खुर्चीला घालतील, असं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे.  बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र फक्त आमच्याच मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार दिसून येतील, असा दावा शिंदे गटामार्फत करण्यात येतोय.

 

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #Common #people's #uproar #occasion #leaders' #meeting #SanjayRaut #BabasahebThackeray #oneseat #empty #gatherings, #नेत्यांच्या #मेळावा #सामान्यांची #होरपळ #दोन्हीमेळाव्यात #एकखुर्ची #रिकामी #संजयराऊत #बाळासाहेबठाकरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेला झटका, संजय राऊतांचा ‘दसरा’ कोठडीतच !
Next Article दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरेंनी दिले अमित शहांना चॅलेंज

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?