Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा

admin
Last updated: 2025/06/28 at 4:22 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 28 जून (हिं.स.) : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली जाणार आहे. रविंद्र चव्हाण सध्या महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. चव्हाण यांच्या नावाची घोषणा 1 रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने हे पद रिक्त आहे. यामुळे आता राज्य संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जानेवारी 2025 मध्ये त्यांच्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.दरम्यान, भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जवळपास एक वर्षापासून रखडली आहे. ती प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह 12 राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची घोषणा होणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीपुर्वी अनेक राज्यांच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने शुक्रवारी देशातील 3 राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक नेमले त्यानुसार केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची महाराष्ट्रचे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जून रोजी अर्ज भरतील. त्यानंतर सर्वानुमते मंगळवारी 1 जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 1 जुलैला सकाळी ११ वाजता त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख
Next Article परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – ॲड. आशिष शेलार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?